About Me

Posts

Search

Saturday, August 11, 2018

स्त्री भृणहत्या व उपाययोजना

स्त्री भृणहत्या व उपाययोजना

         

         गर्भलिंग निदान आणि स्त्री भृण हत्या याचे प्रमाण खूपच वाढले आहे. अगतिकतेतून निर्माण झालेली हि मानसिकता आहे. या अगतिकतेची अनेक कारणे आहेत. ग्रामीण आणि शहरी उच्चभ्रू असे वेगवेगळे स्थरही यामध्ये असले तरी याबाबत दिघ्रकालीन कारणाचा शोध घेणे आवश्यक आहे. आज स्त्री भृण हत्या हि एक चिंतेचा मुद्दा बनत चालला आहे. महाराष्ट्रात बीड जिल्ह्याप्रमाणे आता मुंबईत हि अशा हत्या झाल्याचे उघड होत आहे. या देशात स्त्री मातेसमान मानतात. स्त्री हि क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे किंवा घरी मुलीचा जन्म झाल्यास तिला साक्षात लक्ष्मी घरात आली असे विचार करणारे. आज त्याच भारत देशात राजरोसपणे स्त्री भृण हत्या होताना दिसत आहे. असे का होत आहे हे शोधणे गरजेचं आहे.
         गर्भलिंग निदान आणि स्त्री भृणहत्या या आजकाल असे म्हणतात कि खूप धाडसाचे काम झाले आहे. काय आता आईला मुलगी नको असते कि जन्मदात्या पित्याला ? तिचा बाप म्हणून घ्यायाला आवडत नाही. असे म्हणतात कि, आईला मुलगा आणि बापाला मुलगी जवळची असते. पण तोच बाप आज मुलगी जन्माला यायच्या आधी तिला त्या आईच्या उदरामध्ये मारून टाकतो. तुम्हाला घरचा दिवा लागतो. मग पणती का नको ? या सर्व गोष्टींचा विचार करता एक लक्षात येते कि हि एक आगतिकतेतून निर्माण झालेली मानसिकता आहे. या स्त्रिया त्याग, नम्रता, श्रद्धा व सुजानपणा यांची मूर्ती आहे.
         भारतीय तत्त्वज्ञानानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभूत सुविधा व समृद्धी देणारी लक्ष्मी. आणि दुसऱ्या टोकाला शक्ती देणारी व संरक्षण देणारी महाकाली दुर्गा आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदू मध्ये ज्ञान, कल्पना देणारी महासरस्वती असते. तसं पाहता समाजातील स्वतःचे न्यायस्थान जग भरात कुठेहि भारतातील महिलांना पुरुषाप्रमाणे उक्ते मिळाले नाही. गेल्या शतकात त्यांना करावाया लागलेल्या संघर्षवीच्या आणि त्यातून महिलांनी साधलेली प्रगतीचा थोडक्यात प्रवास.
         १९५० मध्ये प्रेम माथुर या भारतातील पाहिल्या व्यावसायिक महिला वैमानिक होण्याचा मान मिळवला.१९९५ च्या ऑलंपिक स्पर्धेमध्ये पुरुष व महिलांना एकत्र खेळण्याची संधी मिळाली. भारत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, सुचेता कृपलानी यांना भारतातील पहिल्या मुख्यमंत्री होण्याचा मान दिला. भारतीय पोलीस सेवेत अधिकारी पदावर किरण बेदी यांची निवड झाली. मदर तेरेसा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. भारतीय सैन्य दलात महिलांचा प्रवेश, भारताच्या राष्ट्रपती पदी महिलेची निवड प्रतिभाताई पाटील, गान सम्राद्नी लता मंगेशकर यांना भारतरत्न किताब, भारतात स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये महिलांना ५०% आरक्षण मिळाले. देवाने जेंव्हा हे जग बनवले तेव्हा या जगाला वाढवण्यासाठी व त्या जगाचं पालन-पोषण करण्यासाठी एक स्त्री बनवली. या विचारातून एक आई, एक मुलगी, एक बहिण आणि अशाच आणखी महिला जाती याच्याशी जोडलेला आहेत. जो आपल्या संसाराला पुढे नेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करते. ती नारी जातीची सुरवात होते.

        आज काल काहि लोक या गोष्टीला शाप का मानतात ? जर असेच आहे तर याचे कारण पण आपणच आहे. जसं हुंड्याच्या नावाखाली आपण एका सुनेची जाळून हत्या करतो. अशीच काही कारणे आहेत. जेंव्हा एक घर विचार करते कि त्या घरात मुलगी जन्मला येता कामा नये. तिला तिच्या आईच्या उदरामध्ये मारण्याचा प्रयत्न करतात. स्त्रीवादी तत्त्वज्ञानाचा उदय प्रामुख्याने १९६० ला झालेला दिसून येतो आणि हा उदय होण्याचं महत्त्वाच कारण स्त्रीवादी चळवळी. दुसऱ्या स्त्रीवादी चळवळीमुळे स्त्रीवाद हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न झाला. स्त्रीवादी चळवळीने स्त्रियांचे शोषण कसे होते हे अतिशय सविस्तरपणे आणि विविध प्रकारे दाखवून दिले आहे. या शिवाय पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या समाजाची समीक्षा करताना स्त्रीवाद्यांनी स्त्रीमधील स्वजागृतीचे तसेच एकत्रित सामाजिकतेचे दर्शन घडविले. असे करीत असताना सिद्धांत आणि व्यवहार यांच्यातील एकात्मतेचे मोल दाखवून दिले.
         लिंगभावाची संकल्पना महत्त्वाची असून ते या तत्त्वज्ञानावर आधारित आहे. हि संकल्पना सत्ताशास्त्र, ज्ञानशास्त्र तसेच स्वातंत्र्य आणि नितिवाद या संदर्भात आहेत. लिंगभावाचे हे व्यापक तत्व लक्षात घेवून स्त्रीवादी तत्त्वज्ञानानी लिंगभाव उपेक्षित बोलण्यावर भर दिला आहे आणि स्त्रियांच्या या अनुभवाला महत्त्व देत स्त्रियांचे स्थान वस्तूकडून वक्त्याकडे नेले. पहिल्या स्त्रीवादी चळवळीवर इतर सामाजिक आणि राजकीय घटनांनबरोबरच तत्त्वज्ञानाचा प्रभाव होतो. जर आपण स्त्रीवादाचा इतिहास पहिला तर आपल्याला असे जाणवते कि, स्त्रीवाद आणि स्त्रीवादी तत्त्वज्ञान यांनी आपल्या विकासाच्या वाटचालीत परस्परावर प्रभाव टाकलेला आहे. “आई-बाबा मला मारू नका मला जगायचय. मी तुमची मुलगी आहे. मग मला असे दूर का लोटता ?” हे ह्रदयाला पाझर फोडणारे उदगार आहेत ते स्त्रीपिंडाचे. आपण २१ व्या शतकात पदार्पण केले. चंद्रावर जाण्यासाठी म्हणे, बुकिंगसुदधा सुरु आहे. विज्ञान तंत्रज्ञानानुसार उच्च क्षेत्रात प्रगती केली, पण आजही आपले विचार निज दर्जाचे आहेत. मुलगा न झाल्यास आई-वडील शोक करताना दिसतात. “ज्याच्या पदरी पाप त्याला मुली आपोआप” हि भावना लोकांच्या मनात आहे. म्हणून स्त्री भृणहत्या मोठ्या प्रमाणावर होत आहे.
        सध्या तर असे पाहण्यात येत आहे कि, दुसरे अपत्य असेलेल्या मुलींची संख्या १००० मुलांच्या मागे ७५९ आहे. तर प्रत्येक हजार पुरुषा मागे १९९१-९४५ तर २००१-९२७ स्त्रियांची संख्या आहे.
        बालपणापासून असा भेदभाव केला जातो. मुलांना दिली जाणारी खेळणी सुध्दा न्युनगंडाची भावना निर्माण करतात. मुलांना मोटार, विमाने असी खेळणी दिली जातात. तर मुलीना बाहुली दिली जाते. स्त्री हि व्यक्तित्व नव्हे, ती एक खेळणे आहे. याची जणू हि पहिली शिकवण असते. लहानपणी घरी सती सावित्री, पार्वती, सीता यांच्या गोष्टी सांगितल्या जायच्या. पार्वती पतिव्रता होती हे नेहमी मनावर बिंबवले जाते, पण तिचा कणखरपणा, तिची जिद्द याची वाखाणणी कोणीच करत नाही.
        बाजारात जशी वस्तूची खरेदी विक्री होते. त्याचप्रमाणे स्त्रीची सुध्दा एक बाजारातील वस्तू समजून तिची बिनधास्तपणे खरेदी विक्री चालू आहे. खरे पहिले तर या जगाच्या रथाची दोन चाके म्हणजे स्त्री पुरुष. हा रथ व्यवस्थीतपणे चालवायचा असेल तर दोन्ही चाके सारख्याच गतीने चालवण्यासाठी स्त्रीरूपी चाकाला सक्षम बनविणे अत्यावश्यक आहे.
       आज ज्या वेळी एखादा अभ्रक जेव्हा कचऱ्यात सापडतो त्या वेळी आपण डोळे झाक पणे सांगू शकतो हि मुलगी असावी हि आपली शोकांतिका आहे. आज जी आई आपल्या मुलीची हत्या करण्याचा विचार करते त्या वेळी ती एक वेळ कोणाची तरी मुलगी आहे हे का विसरते. हा मोठा यक्ष्य प्रश्न आहे. भारताचे संविधान जगातील एक उत्कृष्ठ म्हणून ओळखले जाते. ज्या वेळी ते संविधान समान नागरी कायदा देते मग स्वतःला कमी समजणे हि स्त्रियांची मानसिकता त्यांना त्यांच्या प्रगतीच्या आडवे येते.
       अरुणिमा सिन्हा नावाच्या तरुणीच्या दोन्ही पायावरून रेल्वे गाड्या रात्र भर जत होत्या. दोन्ही पाय तुटलेले, किडे पाय खात होते. दुसऱ्या दिवशी तिला दिल्ली हॉस्पिटल मध्ये दाखल केले. डॉक्टर बोलले तिला आता चालता येणार नाही. राग आला तिला आणि पण केला कि, मी एव्हरेस्ट सर करणार. जिद्द होती बिचेन्द्री पाल पाशी तिने सराव चालू केला आणि तिने फक्त एव्हरेस्ट नाही तर जगातील सात शिखरे सर केली. जर हि शक्ती माझ्या देशातील स्त्री यांच्यात आली तर मला नाही वाटत तिला स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करावे लागेल.
         असुरांचा नाश करणारी पार्वती सुध्दा स्त्रीच होती आणि सासूच्या धाकाने स्वतःचा जीवाचा तुकडा मारणारी हतबल सुद्धा स्त्रीच. फरक फक्त जिद्दीचा. मग यातील सासू हि स्त्री नव्हे का ? आज समाजातील मानवी विकृती कुठे तरी आपले स्थान निर्माण करू पाहतायेत. त्यांना जागीच ठेचणे गरजेचं आहे. ज्या वेळी एखादा कलाकार आपली कला सादर करतो त्या वेळी पडद्या मागील कलाकाराची सुध्दा भूमिका महत्त्वाची असते. त्याच प्रमाणे आज या प्रश्नात पडद्या मागील कलाकार कि असणारच.
        ज्या वेळी एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीची विरोधी बनते त्या वेळी कोणत्या स्त्री ला वर आणायचं हा प्रश्न पडतो. ज्या वेळी एखाद्या यशस्वी पुरुषा मागे एक स्त्री असते. त्याच प्रमाणे एका दुष्कर्म करणाऱ्या पुरुषा मागे सुध्दा एक स्त्री का असू नये ? आज स्त्री भृणहत्या होण्यासाठी पती सोबत सासू सुध्दा कारणीभूत असते. मग हि सासू स्त्री नव्हे का ? कारणे अनेक पण, उपाय फक्त एकच दिसतो. विचार बदलले पाहिजेत.
          जगात सर्वात बुद्धिमान प्राणी माणूस. तो आपल्या विचार करण्याच्या क्षमतेने काहीही करू शकतो. म्हणून या गोष्टीवर विचार करायला लावणे गरजेच आहे. “जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी” पण ज्या ठिकाणी दोरी धरनारीचाच नाश होत असेल तर पुढील पिढी कशी घडणार ? जगाच्या इतिहासात सीते पासून दौप्रदी पर्यंत अपमानच सहन आली आहे. जर स्त्रीची नरक यातना बंद करायच्या असतील तर स्त्रीनेच पुढाकार घेतला पाहिजे. स्वतःच दुखः इतरांना सांगण्यापेक्षा विचार बदला.
          आज स्त्रियांचे बाजार होतात, पण ते चालवणाऱ्या स्त्रिया सुध्दा कमी नाहीत. ज्या वेळी ‘प्रत्येक’ स्त्री आपल्या अधिकारांसाठी जागी होईल त्या वेळी हे महाराक्षस बनू पाहणारे हे प्रश्न किड्या मुंग्या सारखे आपण चिरडून टाकू. आज मुली नाकारण्याचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुरक्षितता. जेव्हा कोपर्डी सारखी एखादी घटना घडते तेंव्हा हा प्रश्न ऐरणीवर येतो. मग पालक विचार करतात मुलगीच नको. मुलांना शिक्षण दिले जाते पण या शिक्षणा बरोबर संस्काराची कास धरायला शिकवणे गरजेच आहे. शिक्षणाने आम्हाला विचार करायला शिकवले का विकृती हाच मोठा प्रश्न आहे. जेंव्हा मुस्लीम महिलांच सर्वेक्षण केले जाते कि, “त्यांना बुरखा घालायला आवडतो कि नाही.” त्या वेळी सर्वात जास्त महिलांचे मत हे बुरखा घातल्यावर सुरक्षित वाटते असे होते. त्यावेळी वेळी मग हा प्रश्न किती गंभीर आहे याची जाणीव होते. परवाच उत्तम कांबळेचा सकाळ मध्ये लेख आलेला. एका मुलीने टी शर्ट वर घुबडाच चित्र काढले होते. त्यांनी तिला विचारले हे असे का ? तर ती म्हणाली कि हे माझ्याकडे वाईट नजरेने बघणाऱ्यासाठी आहे. मग पुन्हा प्रश्न पडतो आपण मानव कि घुबड !
         प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. या सर्वाना जसे पुरुष जबाबदार तसे स्त्री सुध्दा. जेंव्हा एखादी मॉडेल पैशासाठी जर अर्धनग्न पोझ देत असेल तर मग तिथे आपली संस्कृती कोठे जाते. मग यातूनच बलात्कार, खून आणि न कळत स्त्री भृणहत्या घडते.
                                         
                                          - शुभम यादव.
  




No comments:

Post a Comment

Thank You !