About Me

Posts

Search

Friday, September 21, 2018

धर्मात अडकलेला भारत

        
          समाजातील कारभार सुरळीत चालण्यासाठी लोकांनी आपल्या समूहासाठी बनवलेले नियम व नीती विषयक शिकवण म्हणजेच धर्म होय. यामध्ये मनुष्याने कसे वागावे याची शिकवण दिली जाते. प्रत्येक धर्मानुसार त्यांचे नीतिशास्त्र बदलते. 
         धर्माची सुरुवात ही इ.स.पू काळापासून झाली. जेव्हा माणूस समूहाने राहू लागला तेव्हा त्याला समूहाची एकजूट टिकवण्यासाठी धर्माची निर्मिती झाली . परंतु त्यानंतर वेगवेगळ्या धर्मांची,धर्मगुरूंची,विविध नियमांची निर्मिती झाली. व त्यात कर्मकांड, धर्मग्रंथ यांचा समावेश झाला. जसे की रामायण निर्मिती काळात ते 6000 कडव्यांचे होते. त्यानंतर ते 12000 कडव्यांचे झाले व शेवटी 24000 कडव्यांचे झाले. रामायण जरी महाभारतापेक्षा अधीक एकसंघ असले तरी त्यातील उपदेशपर भाग हा नंतर घुसडलेला आहे. वैदिक कालखंडानंतर कर्मकांडाबाबत       माहिती देणाऱ्या साहित्याची रेलचेल सुरू झाली. त्यातीलच श्रोतसुत्रे व गृहयसूत्रे हे इ.स.पु ६०० ते ३०० या कालावधीत तयार झाली.
              पूर्वीच्या काळी धर्म हा समाज एकतेसाठी तयार केला गेला. परंतु नंतर त्याचे स्वरूप बदलू लागले व कलियुगात तर त्याला बाजारीक स्वरूप प्राप्त झाले आहे. दैवी शक्तीचा स्विकार करणे , त्याची पूजाअर्चा करणे याचा ही समावेश धर्मात होतो. परंतु सध्या त्याचे स्वरूप बदलून अंधश्रद्धा बनले. आज हा समाजाचा मोठा डोलारा धर्माच्या नीतीवर उभा आहे. परंतु त्याची योग्य शिकवण लोकांपर्यंत पोहोचत नाही. धर्म अहिंसा शिकवतो ,भूतदया शिकवतो परंतु ही शिकवण देऊनही प्राण्यांचा बळी दिला जातो. आता आपण त्याची चांगले व वाईट परिणाम पाहू -
       # धर्माचे चांगले परिणाम
            १) धर्मामुळे समाजात एकता निर्माण करण्याचे कार्य केले जाते.
            २) धर्म हा अमूल्य नीतिशास्त्राची व मानवी वर्तनाची शिकवण देतो.
            ३) धर्म हा समाजातील लोकांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देतो.



       # धर्माची वाईट परिणाम
                 १) आज आपल्या समाजात धर्माच्या नावाखाली दंगली घडवल्या जातात.(2017 ला 980)
                 २) धर्मामुळे वेगवेगळ्या समाजात उच्च-नीचतेची भयंकर दरी निर्माण झाली आहे.ज्यामध्ये दररोज कोणाचा तरी बळी जात आहे.
                 ३) खरी धर्माची शिकवण आज सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही म्हणून ते फक्त कर्मकांडात गुंतले जातात.
                 ४) धर्म हा बंधुभाव शिकवत असून सुद्धा आज हिंदू-मुस्लीम एकमेका शत्रू समजतात.
                ५) धर्म फळाची अपेक्षा न धरण्याची शिकवण देतो परंतु आज समाजात प्रत्येक जण स्वार्थासाठी सगळी कार्य करतो.
                ६) धर्माच्या नावाखाली विविध बाबांचा उदय झालेला दिसतो आणि आपणही त्यांना देवत्व बहाल करतो.
                ७) आज सामाजिक संतुलन धर्मामुळेच बिघडलेले दिसते.
                ८) धर्मामुळे काहींना तर व्यवसाय प्राप्त झालेला आहे. त्यामुळेच आज मंदिरांना बाजाराचे स्वरूप आलेले आहे.

        # उपाययोजना
                 १) धर्म हा नीतिशास्त्राची शिकवण आहे त्याचा अंगीकार करणे गरजेचे आहे.
                 २) सुशिक्षित व्यक्ती ने प्रथम धर्म समजावून घेऊन त्यानंतर तो सुशिक्षित लोकांना समजवायला हवा.
                 ३) धर्माच्या नावाखाली दंगली घडवण्याआधी  तो धर्म आपल्याला काय शिकवण देतो हे पाहणे गरजेचे आहे.
                 जर प्रत्येक मनुष्याने आपला धर्म नीट समजावून घेतला तर देशाला न्यायव्यवस्थेची गरजही भासणार नाही. ज्ञानेश्वरांनी एकोणिसाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली पण त्याचा समजून घेण्याचा तरी नक्कीच प्रयत्न आपण करायला हवा.


No comments:

Post a Comment

Thank You !