बुद्धिवाद
रेने देकार्तने आपल्या बुद्धिवादात संशय पद्धतीला महत्व दिले. ज्यावेळी आपण एखाद्या वस्तू बद्दल संशय घेतो तेव्हाच आपण त्या वस्तू बद्दल सर्व ज्ञान घेऊ शकतो. संशय पद्धती आपल्याला त्या वस्तू च्या मूळ ज्ञाना पर्यंत घेऊन जाते. त्याने मनाच्या कार्याच्या दोन पद्धती मानल्या –
1. अंतर्ज्ञान 2. निगमन
या पद्धतीत देकार्तने असे सांगितले आहे कि, जेव्हा कोणत्याही ज्ञान माध्यमाशिवाय आपल्याला ज्ञान मिळते त्यास अंतर्ज्ञान असे म्हणतात. परंतु हि कल्पना चुकीची आहे. कारण कोणत्याही माध्यमाशिवाय ज्ञान मिळणे अशक्य आहे. प्रत्येक ज्ञानापाठीमागे कोणते तरी माध्यम असतेच. आपण मिळवलेल्या अनुभवातून, ज्ञानातून अंतिम निष्कर्ष काढत असतो. हे ज्ञान, अनुभव मिळण्यापाठीमागे माध्यम हे असतेच. आणि याच ज्ञाना, अनुभवा आधारे आपण मुख्य ज्ञाना पर्यंत पोहोचतो. त्या ज्ञानावर आपण संशय घेऊ शकत नाही. त्याला आपण वस्तूचे मूळ ज्ञान सुद्धा म्हणू शकतो. उदा.- एखाद्या वस्तूचा रंग ओळखणे हे आपल्या अनुभवावर किंवा पूर्व ज्ञानावर अवलंबून आहे. त्यानुसार आपण त्यचे मूळ ज्ञान ओळखतो. गुलाब गुलाबी आहे हे त्याचे रंगाचे मूळ ज्ञान होय
शरीर मन संबंध
देकार्तच्या तत्वज्ञानात शरीर मन संबंधावर महत्वपूर्ण चर्चा आढळते. त्याने शरीर व मनाला स्वतंत्र द्रव्य मानले. विस्तार हा शरीराचा गुणधर्म मानला तर मन हा विचार गुणधर्म मानला. पुढे देकार्त म्हणतो कि, शरीर मन स्वरूपत: भिन्न असले तरी त्यांचा निकटचा संबंध आहे. मनावर होणार्या बदलामुळे शरीरवर बदल होतात. शरीर व मन हि दोन्ही द्रव्ये भिन्न असली तरी त्यांच्यात एक्य झालेले असते.
परंतु रेने देकार्तचे हे विचार विसंगत वाटतात. आपण शरीर व मन हि संकल्पना समजून घेताना त्याचे काही प्रकार करू –
१. मेंदू २. बुद्धी ३. मन ४. शरीर
Ø मेंदू – हा शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. मन हे त्याच्या आदेशावर चालते. मेंदूच सर्व मनाचा कार्यभाग चालवते.
Ø बुद्धी – हि अशी गोष्ट आहे कि जी आपण आयुष्यभर मिळवत असतो. यामध्ये चांगल्या व वाईट या दोन्ही गोष्टीचा समावेश असतो. चांगली व वाईट गोष्टीच वर्गीकरण हे आपल्या अनुभवावरून मेंदू करत असतो. बुद्धीच्या आधारेच मेंदू काम करत असतो. ज्ञान हे बुद्धीचा एक भाग आहे.
Ø मन – हे शरीर चालवण्याच काम करते. मेंदू बुद्धीच्या हा मनाला सूचना देत असतो. ती गोष्ट चांगली कि वाईट याची हि सूचना देते. त्याचे परिणाम काय हे हि सांगते. पण ती सूचना अमलात आणायची कि नाही हे मन ठरवते. मन हेच सर्व निर्णय घेत असते.
Ø शरीर – हे एका कठपुतली सारखे आहे. मनाने दिलेल्या सूचनांचे शरीर पालन करत असते. मग ती चांगली अथवा वाईट सूचना असो. त्याचे पालन करण्याचे काम शरीर करते. शरीर हे आपल्या संवेदना द्वारे बुद्धीत भर घालण्याचे काम करते.
उदा – आपण एका रथाचे उदाहरण घेऊ यामध्ये शरीर हा रथ आहे तर मेंदू हा सारथी आहे. बुद्धी हि लगाम आहे तर मन हे घोडे आहेत. सारथी हा लगाम द्वारे घोड्यांना दिशा देत असतो. त्यानुसारच रथ हा पळत असतो. परंतु घोड्यांनी ठरवले कि सारथ्याचे ऐकायचे नाही तर तो रथ भरकटू शकतो. असेच शरीराचे आहे मनाने बुद्धीचे ऐकायचे सोडून दिले तर तो मनुष्य भरकटलेला असतो. हे सर्व मिळून एक रथ तयार होतो हे सर्व त्याचे अनन्यसाधरण भाग आहेत. शरीराचे हि असेच आहे. सर्व भाग मिळून पुर्ण जीवित मनुष्य बनतो. त्यामुळे बुद्धी, मेंदू, शरीर, मन हे वेगळे नसून हे एकच आहेत.
- शुभम यादव
No comments:
Post a Comment
Thank You !